शेतकऱ्यांच्या नावाखाली पीक विमा अनुदान लाटणार्या विमा माफिया याचा पर्दाफाश झाल्यानंतर असे प्रकार जळगाव सह कोल्हापूर, सांगली,पुणे,औरंगाबाद,जालना, कोल्हापुर अश्या जिल्ह्यात सुद्धा उघड झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने चौकशी सुरू केली आहे. राज्यात तपासणी केलेले ऐकून शेतकरी हे 30,982 ( आतापर्यंत ) यामध्ये अयोग्य शेतकरी 2,274 आहेत आणि खरे शेतकरी यामध्ये 28,708 एवढे आहेत.
जो मुख्य किंवा मूळ शेतकरी आहे यात अंधारात ठेवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान या पीक विमा माफिया ( जे शेतकरी नाहीत ) यांनी लाटले आहे.
जळगाव जिल्ह्यात तपासणी केली असता येथे काही शेतकऱ्यांच्या शेतात केळी पीक नसतानाही पीक विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची तपासणी केली असता शेतकऱ्यांच्या नावाखाली भलतेच लोक या पीक विमाचे अनुदान प्राप्त करून घेत आहेत. आता कृषी विभागाने चौकशी सुरू केल्यामुळे सर्वांचीच खळबळ उडाली आहे.
यावर्षी खरीप हंगामात जवजवळ 2 लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या सोबत जवजवळ 30 हजार 982 शेतकर्यांनी प्रत्यक्ष पीक पाहणी केली आहे. कृषी विभागाच्या वेबसाईट वरून कोणालाही पीक विमा काढता येतो. त्यासाठी सातबारा उतारा व आधार कार्ड ची गरज असते.याचाच फायदा हे विमा माफिया वाले घेतात. हे माफिया विमा उतरविण्याच्या शेवटच्या दिवशी विमा न काढलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने विमा काढतात.
Crop Insurance Maharashtra
महत्वाचे म्हणजे हमखास अनुदान प्राप्त होत असल्याने कुठल्या पिकाचा विमा काढायचा हे त्यांना चांगलेच माहीत असते. यातून ते अनुदान प्राप्त करतात कारण त्यांना माहीत असते की या पिकाचे अनुदान येणार आहे.असे हे विमा माफिया वाले स्वतःची शेती नसतानाही असे विमा काढून अनुदान प्राप्त करतात या कृषी विभागाच्या चौकशी तून स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एका गावात जवळजवळ 70 शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचे विमा काढल्याचे संकेतस्थळावर दिसते. मात्र प्रत्यक्ष पाहणीत केवळ तीनच शेतकऱ्यांकडे डाळिंब पीक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगली जिल्हयात जत तालुक्यात एक शेतकऱ्याने लिंबू पीक विमा काढला होता. प्रत्यक्ष पाहणीत त्या शेतात सोयाबीन हे पीक होते. तपासणीत पाहिले असता ज्या शेतकऱ्याने विमा काढला त्या व्यक्तीच्या नावावर शेतजमीन नव्हती तो सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातील असल्याचे सिद्ध झाले.
गेल्या वर्षी या व्यक्तीने अनुदानापोटी 1 लाख 20 हजार कमावले अजून चौकशी केली असता त्याच्या संपूर्ण कुटुंबाने पीक विमा काढल्याचे आढळले. त्यातून त्याने गेल्या वर्षी 15 लाख कमवले होते.
तर अश्या पीक विमा माफियाचे जाळे जळगाव सह सोलापूर तसेच अहमदनगर, धुळे, नागपूर, नाशिक,सोलापूर,औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर , सांगली तसेच नागपूर असल्याचे विविध चौकशीत सिद्ध झाले आहे
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…