तुमच्या गावामध्ये गाय गोठा तसेच विहीरी ची योजना कोणी घेतली आहे. तुम्हाला योजना पाहिजे असेल तर काय करावे लागेल. तुमच्या गावात शासनाचे घरकुल जर आलेले असतील तर त्याची यादी दिसेल. गावातील सर्व योजनांची माहिती या ठिकाणी दिसेल.
नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनामार्फत तसेच केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना अनेक ग्राम पातळीवर योजना येत असतात. ग्रामपंचायत या संदर्भात आपल्याला माहिती देत असते.
विहीर योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, फळबाग योजना, घरकुल योजना ..इत्यादी.
या योजना तर आलेल्या आपल्याला माहीत असतात पण कोणाच्या मंजूर झाल्या कोणाच्या नाही तसेच सध्या कोणत्या योजना आपल्या ग्रामपंचायती मध्ये चालू आहेत त्याचे अनुदान ही येत आहे.
ही माहिती आपल्याला कोणी सांगत नाही किंबहुना आपण त्या संदर्भात चौकशी सुद्धा केलेली नसते.
तर मित्रानो आपण या लेखा मध्ये या संदर्भात पूर्ण माहिती पाहणार आहोत.
शेतकरी बंधुनो गाय गोठा तसेच घरकुल आणि सिंचन विहीर या योजना चालू आहेत त्याचा लाभ कोणी घेतला यांची संपूर्ण यादी तुम्हाला दिसेल.
जर गावामध्ये घरकुल आले असतील तर कोणाचे आलेत कोणाच्या घरकुलाचे काम चालू आहे तसेच इतर कामे सुद्धा या ठिकाणी पाहू शकता तसेच या संदर्भात यादी तुम्हाला पहायला मिळेल.
ही सर्व माहिती पहायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला मनरेगा च्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे. ( या संदर्भात लिंक खाली दिलेली आहे )
नरेगा / मनरेगा वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लीक करा
● वेबसाईट ( मनरेगा ) वर आल्यानंतर खालील चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्हाला आर्थिक वर्ष निवडायचे आहे. ( ज्या आर्थिक वर्षांची माहिती पाहिजे ती या ठिकाणी टाका ) .
● आर्थिक वर्ष टाकल्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी टाका, जिल्हा टाकल्यानंतर तुमचा तालुका टाका आणि त्यानंतर तुमची ग्रामपंचायत निवडा. ( चित्रात दाखवल्याप्रमाणे ). त्यानंतर Proceed करा.
● Proceed केल्यानंतर ग्राम पंचायत रिपोर्ट ( Gram Panchayat Report ) तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही खाली उजव्या बाजूला IPPE हे दिसेल ( IPPE Means Integrated Participatory Planning Exercise ).
त्यांच्यामध्ये लिस्ट ऑफ वर्क ( list of work ) यावर क्लीक करायचे आहे ( चित्रात दाखवल्याप्रमाणे )
● क्लीक केल्यानंतर नवीन टॅब ( Tab ) उघडेल.
खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे तुम्हाला कामाचा वर्ग दिसेल त्यानंतर त्याच्या समोर work status दिसेल त्यानंतर financial year ( आर्थिक वर्ष दिसेल )
( टीप : ही माहिती जर आवडली असेल तर खाली whatsap share button आहे त्यावर क्लीक करून इतरांना पाठवू शकता )
_____धन्यवाद ( Thank you )______
ग्राम पंचायत मध्ये चालू योजनांची यादी वर असणाऱ्या लिंक वर क्लीक करून ती तुम्ही पाहू शकता
नरेगा / मनरेगा वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लीक करा
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…