मुघल गार्डन आता अमृत उद्यान या नावाने ओळखणार : केंद्र सरकारची नवीन घोषणा : –

मुघल गार्डन आता अमृत उद्यान या नावाने ओळखणार केंद्र सरकारची नवीन घोषणा

 

 

 

NEW DELHI MUGHAL GARDEN NEWS  

राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन परिसरातील प्रसिद्ध असलेले मुघल गार्डन चे नाव बदलले आता ते ‘ अमृत उद्यान ‘ या नावाने यापुढे ओळखले जाणारे आहे. या बाबत घोषणा शनिवारी ( दि. 28 जानेवारी 2023 ) केंद्र सरकारने केली.

स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय केंद्र सरकार कडून घेण्यात आला आहे. या वर्षी हे गार्डन  ‘नवीन अमृत उद्यान ( गार्डन ) ‘ पर्यटकांसाठी दोन महिने खुले राहणार असून येणाऱ्या पावसाळ्यातही सुरू ठेवण्याचा सरकरचा प्रयत्न आहे.

 

                      


उद्यान चा इतिहास :

1911 मध्ये इंग्रजांनी राजधानी कलकत्ता पासून दिल्ली या ठिकाणी हलवली. दिल्ली ला डिझाईन करण्यासाठी ( व्हाइसरॉय हाऊस ) प्रसिद्ध इंग्रज वास्तुकार एडवर्ड लुटीयन्स ला भारतात बोलावले.या वास्तुकराने रायसीना डोंगरावर या व्हाइसरॉय हाऊस ( आत्ताचे राष्ट्रपती भवन )  ची निर्मिती केली यामध्ये या उद्यानाची निर्मिती सुद्धा याच ठिकाणी झाली. सन 1917 सर एडवर्ड लुटीयन्स ( ब्रिटिश वास्तू रचनाकार ) यांनी या उद्यानाचे ( नवीन नाव अमृत उद्यान ) डिझाईन बनवले होते. प्रत्यक्षात म्हणजे 1 वर्षां नंतर ( सन 1928 मध्ये ) या उद्याची निर्मिती झाली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हे गार्डन सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता.



    

                 



 या अमृत उद्यानची खासियत काय आहे ?

 हे उद्यान 15 एकर परिसरात पसरले असून राष्ट्रपतीभवन शेजारी असल्याने याला विशेष महत्व आहे. हे उद्यान वसंत ऋतू मध्ये ( फेब्रुवारी – मार्च मध्ये दरवर्षी सकाळी 9:30 ते 2:30 ) दरम्यान सर्वांसाठी खुले केले जात होते, फक्त सोमवारी हे उद्यान बंद असायचे. या उद्यानाचे अनेक विभाग केले आहे यामध्ये डायव्हर्सिटी पार्क, हर्बल गार्डन, बटरफ्लाय, म्युजिकल फाउंटन, बायो प्युअल पार्क, न्यूट्रीशियन गार्डन आणि कॅक्ट्स गार्डन हे आहेत. या गार्डन मध्ये अनेक रंगबिरंगी फुलांची झाडे आहेत. त्यामूळे या ठिकाणी वातावरण सुद्धा प्रसन्न राहते, यामध्ये रजनीगंधा, बेला, रातराणी, जुही, चंपा, चमेली, मोगरा मोतिया यासारखे महत्वाची झाडे नजरेत पडतात. या उद्यानात 70 प्रजातीची 5 हजाराहुन अधिक फुले उभा उद्यानात पहायला मिळतात.



                     

यावर्षी ( 2023 ) हे अमृत उद्यान प्रसिद्धीत का आहे ?


 – यावर्षी या मुघल गार्डन चे नाव बदलून अमृत उद्यान असे करण्यात आले.

– आता हे अमृत उद्यान 31 जानेवारी 2023 ते 26 मार्च 2023 पर्यंत पर्यटनासाठी खुले ठेवले जाणार आहे.

– यामध्ये वेळ आता सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 

– ऑनलाइन बुकिंग सुविधा, उद्यानाच्या रोपाजवळ क्यूआर कोड, माहिती देणारे कर्मचारी, उद्यानात अनेक सेल्फी पॉईंट आहेत.



सरकारी योजना

View Comments

Recent Posts

अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर Solar Pump Yadi 2024

Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…

6 months ago

लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari

नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…

6 months ago

सीआयबीआययल स्कोर कसा पहायचा Cibil Score Kasa Pahayacha | cibil score check free

 सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check |  cibil score check free…

6 months ago

driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा

driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…

6 months ago

निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget

आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…

6 months ago

फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…

6 months ago