नमस्कार मित्रांनो माघील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील रखडलेली नोकर भरती पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे. तसे कारण ही आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने घोषणा केली होती की एप्रिल 2023 पासून नोकरभरतीला सुरुवात होतील. पण एप्रिल महिना सुरू झाले तरी अद्याप सरकार मार्फत कोणतीही जाहिरात निघाली नाही फक्त आणि फक्त सूचनांचा पाऊस पाहायला मिळतो आहे. लवकरात लवकर भरती प्रक्रिया पार पडण्याचे आश्वासन सरकार कडून दिले होते पण अद्याप तरी या परीक्षांचे वेळापत्रक आले नाही. नुकतेच 12 एप्रिल 2023 रोजी ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोकरभरती सुरू करण्यासंदर्भात सूचना ही केल्या आहेत पण त्यासदर्भात नवीन काही घडले नाही.
काही दिवसांपूर्वी सरकार मार्फत या स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी निम्मित या वर्षभरात जवजवळ 75 हजार पदे भरायची असून ती सर्व 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरायची आहेत असे सांगितले होते. ,या साठी किंवा जिल्हा परिषद भरती साठी TCS, IBPS या सारख्या IT कंपन्यांची मदत घेऊन ऑनलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्या संदर्भात सूचना ही आल्या आहेत. तसेच या TCS आणि IBPS कंपन्यांची सरकार सोबत करार नामा सुद्धा झाला आहे. फक्त या जाहिराती येणे आणि परीक्षा घेऊन जॉईनिंग देणे एवढे काम बाकी आहे.
या परीक्षा घेण्यासाठी ” अप्लिकेशन पोर्टल ” विकसित करण्याचे काम आता या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या करत आहे. यामध्ये लागणारा जाहिरातीचा नमुना , रिक्त पदांची भरती, आरक्षण, शैक्षणिक मर्यादा, इतर सर्व माहिती त्यांना पाठवण्याचे काम सरकार कडून चालू आहे. जर काही दिवस ही नोकरभरती रखडली तर ती आचार संहितेत अडकून बसेल त्यामुळे सर्व विभागातून या नोकरभरती लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे
तुम्ही पाहिले असेल की जवजवळ 4- 5 वर्ष नोकरभरती न झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष आहे.त्यामूळे एकदा का भरती झाली या मध्ये व्यत्यय येऊ नये तसेच सर्व हेल्पलाईन सुविधा उमेदवारांना मिळाव्यात अशी सूचनाही सरकार मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले गेले आहे. असं म्हणता येईल की येत्या दोन महिन्यांच्या आत हो नोकरभरती सुरू होणार आहे. बर्याच उमेद्वारांचे सरकारी अधिकरी होण्याचे स्वप्न यातून साकारणार आहे
Tags :
job News,
Employment News Maharashtra,
ZP News Recruitment,
Maharashtra news Megabharti 2023,
Trending News Maharashtra Megabharti,
Megabharti 2023 Annoucement news,
TCS And IBPS maharashtra Online Exam News,
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…