APAAR ID
APAAR ID विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दस्तऐवजांच्या सुरक्षिततेसाठी आणि कंपन्यांसाठी सोईसाठी केंद्र सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे
या योजनेंतर्गत पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी (APAAR ID) तयार करण्यात येणार आहे शाळांमध्ये या योजनेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अपार आयडी म्हणजे ऑटोमॅटीक पर्मनंट एकेडमिक अकाऊंट रजिस्टर आयडी जी एक विशिष्ट ओळख प्रणाली आहे ही प्रणाली डिजीलॉकरसारखीच कार्य करणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांचे डिजिटल संग्रहण करणारे खाते असेल
अपार आयडीसाठी नोंदणी प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या शाळांमध्येच होईल
विद्यार्थ्यांची माहिती कोणत्याही संस्थेशी शेअर करण्यासाठी पालकांची परवानगी आधी घेतली जाईल. परंतु पालकांना ही परवानगी काढून घेण्याचाही पर्याय असेल. परवानगी काढल्यानंतर, आधी शेअर केलेली माहिती मात्र कायम राहील
प्रश्न 1 : अपार आयडी म्हणजे काय ?
उत्तर : अपार आयडी म्हणजे ऑटोमॅटीक पर्मनंट एकेडमिक अकाऊंट रजिस्टर आयडी, ज्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे डिजिटली साठवली जातात
प्रश्न 2 अपार आयडीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उत्तर : आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र व पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे
प्रश्न 3 : अपार आयडी नोंदणी कधी आणि कुठे केली जाईल ?
उत्तर : ही नोंदणी विद्यार्थ्यांच्या शाळांमध्येच केली जाईल आणि apaar.education.gov.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन होईल
प्रश्न 4 : ही प्रणाली कोणत्या प्रकारे कार्य करते ?
उत्तर : डिजीलॉकरप्रमाणे अपार आयडी प्रणाली विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचे डिजिटल संग्रहण करते
प्रश्न 5 : विद्यार्थ्यांसाठी या योजनेचे फायदे काय आहेत ?
उत्तर: हरवलेली कागदपत्रे सहज मिळणे, शाळा बदलताना सुलभता, आणि नोकरीसाठी कागदपत्रांची पडताळणी सोपी होणे
प्रश्न 6 : नोकरीसाठी या आयडीचा उपयोग कसा होईल ?
उत्तर : कंपन्या एका क्लिकवर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करू शकतील
प्रश्न 7 : पालकांची परवानगी कशी मिळवली जाईल ?
उत्तर: शाळांमार्फत पालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतले जाईल
प्रश्न 8: पालकांनी परवानगी नाकारल्यास काय होईल?
उत्तर: पालकांना परवानगी नाकारण्याचा अधिकार आहे, परंतु आधी शेअर केलेली माहिती कायम राहील.
प्रश्न 9 : ही प्रणाली विद्यार्थ्यांची गोपनीयता कशी राखेल ?
उत्तर: विद्यार्थ्यांची माहिती सुरक्षित ठेवली जाईल आणि फक्त पालकांच्या परवानगीनेच ती शेअर केली जाईल
प्रश्न 10 : अपार आयडीचा उपयोग कोणत्या परिस्थितीत होईल ?
उत्तर: शाळा बदलताना, राज्यांदरम्यान स्थलांतर करताना किंवा हरवलेली कागदपत्रे पुन्हा मिळवण्यासाठी याचा उपयोग होईल
ही योजना विद्यार्थ्यांच्या आणि कंपन्यांच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरणार आहे. शैक्षणिक दस्तऐवजांच्या डिजिटल व्यवस्थापनामुळे प्रक्रियेत गती येईल आणि विश्वासार्हता वाढेल
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…