फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेमार्फत जे पात्र महिला आहेत त्यांना मोफत अर्थात फ्री मध्ये गॅस आणि शेगडी मिळत आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा तसेच त्यानंतर किती दिवसाची प्रोसेस होते याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत.

यामध्ये आपण भारत गॅस मध्ये उज्वला गॅस नोंदणी कशी करायची तसेच इंडियन गॅस मध्ये आणि एचपी गॅस मध्ये कशी करायची याबद्दल माहिती पाहणार आहोत या संदर्भात लिंक खाली दिलेल्या आहेत यासाठी काय काय आवश्यक आहे तर तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल आणि महिला वर्ग जर असेल तर तुम्हाला हा गॅस मोफत मध्ये मिळणार आहे सोबत शेगडी सुद्धा मिळणार आहे.

उज्वला 3.0 गॅस नोंद साठी येथे क्लिक करा

भारत गॅस साठी इथे क्लिक करा

इनडेन घ्या साठी इथे क्लिक करा

एचपी गॅस साठी येथे क्लिक करा

उज्वला गॅस नोंदणी अंतर्गत पात्रता

  • महिला अर्जदाराचे वय हे 18 वर्षे पूर्ण असावे
  • फक्त महिलेलाच अर्ज करता येईल
  • महिलेच्या घरामध्ये कोणतेच ओ एम सी एलपीजी कनेक्शन नसावे.
  • सर्व वर्गाच्या महिला यामध्ये अर्ज करू शकणार आहे यामध्ये रोड महिला एसएसटी मधील तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमधील , मागासवर्गीय असेल ते सुद्धा त्यानंतर अंत्योदय अन्न योजनांमधील महिला, वनवासी महिला या सर्व या योजनेसाठी पात्र आहेत

उज्वला गॅस साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • केवायसी फॉर्म
  • बँक पासबुक असेल तर बँक पासबुक
  • रेशन कार्ड ची प्रत

अर्ज कसा करणार ?

तुम्ही जर महिला असाल आणि तुम्हाला जर मोफत गॅस नोंदणी पाहिजे असेल आणि उज्वला 3.0 अंतर्गतच पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्या कंपनीचा गॅस पाहिजे अर्थात भारत गॅस, इंडियन गॅस किंवा एचपी गॅस.

हे कसे ठरवणार की कोणत्या कंपनीचा गॅस पाहिजे ? तसं जर पहिले तिन्ही कंपन्या चांगल्याच आहेत पण बऱ्याचदा आपल्या जवळच जी गॅस कंपनी असते तीच घेतलेली आपल्याला फायदेशीर ठरते यामध्ये भारत गॅस असेल किंवा इंडियन गॅस असेल किंवा एचपी गॅस असेल यापैकी कोणतीही चॉईस करा

अर्ज करण्यासाठी वर लिंक्स दिले आहेत त्यावर क्लिक करा आणि पुढे जा

क्लिक करून गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या गॅस नोंदणी अंतर्गत अर्ज करायचा आहे तो पर्याय या ठिकाणी निवडा.

  • पर्याय करा आणि ओके बटन क्लिक करून पुढे जा
  • पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायला सांगेल राज्य निवडा या ठिकाणी महाराष्ट्र म्हणून तुम्ही निवडू शकता
  • राज्य निवडल्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा ऑप्शन येईल यामध्ये तुम्ही जिल्ह्याची निवड करू शकता
  • जर तुम्ही भारत गॅस यामध्ये नोंदणी करीत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी एजन्सीची निवड करायला सांगेल
  • तर तुमच्या जवळच्या किंवा तुम्ही ज्या लोकल एरिया मध्ये राहतात त्या ठिकाणच्या गॅस एजन्सी निवड या ठिकाणी करू शकता जेणेकरून तुम्हाला तत्काळ गॅस मिळेल तुम्हाला विविध पर्याय जिल्ह्यातील दिसतील त्यापैकी एक निवडा
  • त्याच्यानंतर खाली कंटिन्यू नावाचा ऑप्शन दिसत त्यावर क्लिक करा
  • कंटिन्यू ला ओके केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन येईल आणि ते सर्व करून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही जर तुमचा मोबाईल नंबर इतरांना गॅस नोंदणीसाठी दिला असेल तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी डबल घेणार नाही तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर द्यावा लागेल
  • दुसऱ्या मोबाईल वरून घेतल्यानंतर तिथे सबमिट करा त्यानंतरची आवश्यक माहिती आहे ती या ठिकाणी भरा
  • माहिती भरल्यानंतर ओके बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा Ujwala 3.0 gas
  • आणि तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन या संदर्भात चौकशी करून उज्वला 3.0 गॅस मिळवू शकता
  • अशाप्रकारे अर्ज करून तुम्ही पीएम उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळू शकतात

उज्ज्वला 3.0 योजने संदर्भात प्रश्न -उत्तरे

१. प्रश्न – उज्ज्वला 3.0 योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर – उज्ज्वला 3.0 योजनेचा मुख्य उद्देश गरजू आणि पात्र महिलांना मोफत गॅस कनेक्शन आणि शेगडी पुरवणे आहे, जेणेकरून स्वयंपाक करताना आरोग्यसंबंधित समस्या टाळता येतील

2. प्रश्न – या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहेत ?

उत्तर

  • अर्जदार महिला असावी.
  • वय किमान 18 वर्षे असावे.
  • घरामध्ये कोणतेही OMC LPG कनेक्शन नसावे.
  • अनुसूचित जाती, जमाती, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री आवास योजना इत्यादीतील महिला पात्र आहेत

3. प्रश्न : अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

उत्तर

  • आधार कार्ड
  • केवायसी फॉर्म
  • बँक पासबुक
  • रेशन कार्डची प्रत

4. प्रश्न : अर्ज कुठे आणि कसा करायचा ?

उत्तर : उज्ज्वला 3.0 योजनेसाठी अर्ज भारत गॅस, इंडियन गॅस, किंवा HP गॅसच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने करता येतो. वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करू शकता

5. प्रश्न : कोणत्या गॅस कंपनीचा कनेक्शन निवडायचा ?

उत्तर : गॅस कंपनी निवडताना तुमच्या जवळची उपलब्ध गॅस एजन्सी विचारात घ्या. भारत गॅस, इंडियन गॅस, आणि HP गॅस कोणतीही निवडू शकता.

6. प्रश्न : अर्ज केल्यानंतर किती दिवसांत गॅस कनेक्शन मिळतो ?

उत्तर : सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही दिवसांत (सामान्यतः 7-10 दिवसांत) गॅस कनेक्शन मिळण्याची शक्यता आहे

7. प्रश्न : अर्ज करताना मोबाईल नंबर का आवश्यक आहे ?

उत्तर : मोबाईल नंबर आवश्यक आहे कारण अर्जाची ओटीपी (OTP) पडताळणी त्यावर केली जाते. हा नंबर पूर्वी इतर अर्जासाठी वापरलेला नसावा

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment