Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम ही योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेमधून शेतकऱ्यांना शेतासाठी किंवा शेतासाठी जल पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी सोलर पंप ची योजना काढलेली आहे.
या योजनेमार्फत शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जातात. नुकतेच केंद्र सरकारने या सोलर पंप ची लाभार्थी 2024 ची यादी शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे. ही यादी तुम्ही मोबाईलवर सुद्धा पाहू शकता.
सोलर पंप यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
चला तर पाहू आता या सोलार पंप ची यादी कशी पहायची मोबाईलवर ?
- सर्वप्रथम तुम्हाला केंद्र सरकारची कुसुम सोलर पंप च्या वेबसाईटवर यायचं आहे लिंक पुढे https://pmkusum.mnre.gov.in/#/beneficiary-list आहे.
- ही वेबसाईट केंद्र शासनाच्या सोलर पंप ची वेबसाईट आहे किंवा तिला पीएम कुसुम नवीन आणि नवीन` करणे नवीन करणीय ऊर्जा वेबसाईट सुद्धा म्हटले जाते.
- या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पुढे हा ऑप्शन दिसेल Scheme Beneficiary List
- त्याच्या खाली विविध कॉलम दिसतील याच्यामध्ये आपले राज्य निवडायचे यामध्ये आपण महाराष्ट्र निवडणार
- महाराष्ट्र मध्ये दोन प्रकारे त्याच्यामध्ये एक म्हणजे महाराष्ट्र मेढा तसेच महाराष्ट्र एम एस सी डी सी एल, तर तुम्ही महाराष्ट्र एम एस डी सी एल मध्ये अर्ज भरला असेल तर तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे
- त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे
- जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही किती पंप क्षमतेसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे उदाहरणार्थ 3 एचपी, 5 एचपी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो या ठिकाणी निवडायचा आहे
- पुढे तुम्हाला कोणत्या वर्षात अर्ज केले आहे ते वर्ष या ठिकाणी निवडायचे आहे.
- हे पर्याय निवडल्यानंतर पुढे तुम्ही गो या बटनावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला पूर्ण जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिसेल.
- यादी दिसल्यानंतर तुम्ही ही यादी एक्सेल मध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा पीडीएफ मध्ये सुद्धा घेऊ शकता
- या यादीमध्ये तुमचे नाव शोधा आणि तुमचे जर नावे याच्यामध्ये असेल तर तुम्हाला कोणत्या कंपनी मार्फत सोलर पंप इन्स्टॉलेशन करून मिळणार आहे त्या कंपनीचे नाव सुद्धा समोरच असणार आहे .
- तर अशाप्रकारे तुम्ही तुमचे नाव या सोलर पंप यादीमध्ये पाहू शकता आणि ती इतरांना सुद्धा तुम्ही दाखवू शकता.