मेगाभरती बाबत महत्वाची बातमी | या तारखेला मेगाभरती चालू होईल – Megabharti Upate 2023

मेगाभरती बाबत महत्वाची बातमी :

2023 Megabharti 2023 update eknath shinde
Megabharti 2023 Update


महाराष्ट्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्याचे औचित्य साधून यावर्षी 75 हजार पदांची शासकीय भरती करणार अशी घोषणा केली. पण घोषणा होऊन जवळजवळ 1 महिना उलटून गेला तरी भरती संदर्भात कोणतीच अपडेट आली नाही. ” महिना भरात जर भरती संदर्भात कोणताही कृती आराखडा ( भरती संदर्भात एकूण जागा आणि भरतीचे वेळापत्रक ) आले / आला नाही तर ही मोठी मेगाभरती येणाऱ्या निवडणुकांच्या आचारसंहितेमध्ये अडकली जाईल.” आधी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी सांगितले आहे अशी माहिती सूत्रांनी सांगितली.
Megabharti 2023 Update 


माघील वर्षी लोकसभा निवडणूक ही 23 मे रोजी पार पाडली होती.त्यामुळे असे म्हणता येईल की 2024 मध्ये मे महिन्यात लोकसभा निवडणूक आणि ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभेची निवडणूक होईल, त्याच्याधी पंचायत समित्या, जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या पावसाळ्या पूर्वी दोन टप्प्यात ( यामध्ये जवळजवळ 90 ते 100 दिवस ) निवडणूक होतील. तसेच प्रभाग रचनेचा जो तिढा आहे तो पुढील आठवड्यात सुटण्याची जास्त शक्यता आहे.


हे पण पहा : 

अतिवृष्टी नुकसान भरपाई आता नवीन पद्धतीने होणार जमा | नवीन पद्धत खूपच चांगली आहे



यावर्षी राज्यात 18 हजार पोलीस भरती साठी जवळजवळ 18 लाख उमेदवारांनी अर्ज केले. तर हाच अंदाज बांधून मेगाभर्ती चे नियोजन करावे लागणार आहे यामध्ये या 75 हजार शासकीय पदांच्या मेगाभर्ती साठी 40 लाखांहून अधिक उमेदवारांचे अर्ज येतील. महत्वाचे म्हणजे एका विभागाची परीक्षा ही एकाच वेळी घ्यावी लागणार आहे.त्यामुळे याचा ताण कंपनी ( परीक्षा घेणारी ) वर येणार आहे. आणि या कंपन्यांकडे तेवढे मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध नसल्याची स्थिती संदर्भात कंपनीने सरकारकडे केली आहे. म्हणून सामान्य प्रशासनाचे अधिकारी यांनी सांगितले आहे की भरती ही आचारसंहिता पूर्वी होते गरजेचे आहे.


मेगाभर्ती वेळेवर होणे गरजेचे आहे नाहीतर वयोमर्यादा संपेल ?

megabharti 2023 Update 
राज्य सरकारमधील 17 लाख मंजूर पदांपैकी तब्बल पावणेतीन लाख पदे यावर्षी पर्यंत रिक्त आहेत. यामध्ये महसूल, जिल्हा परिषद, अन्न व नागरी पुरवठा, राज्य उत्पादन शुल्क यासारखे विभागातील पदे यावर्षी तातडीने भरली जाणार आहे. पण जवळजवळ 4 वर्षांपासून या मेगाभर्ती आमिष या उमेदवारांना दाखवले जात आहे, परंतु सहस्थित कोणतीच मेगाभर्ती झाली नाही. कोरोनाच्या काळात एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुद्धा केले होते. दरवर्षी हजारो तरुण- तरुणी या मेगाभरती ची वाट पाहत आहे. प्रत्येक वर्षी ही मेगाभर्ती पुढे ढकलली आहे. त्यामुळे प्रत्येक हजारो तरुण- तरुणींचे वय संपुष्टात येत आहे. यावर्षी पुन्हा शिंदे- फडवणीस सरकारने मेगाभर्ती होईल अशी घोषणा केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की यावर्षी ते पण फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात ही भरती होणे गरजेचे आहे. नाहीतर ही मेगाभर्ती प्रत्येक वेळी प्रमाणे आचार संहिता मध्ये अडकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.


हे पण पहा : 
WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment