बियाणे अनुदान योजना 2024, बियाणे अनुदान अर्ज सुरू | Mahadbt Biyane Anudan 2024

 बियाणे अनुदान योजना 2024, बियाणे अनुदान अर्ज सुरू | Mahadbt
Biyane anudan 2024

 
Biyane Anudan Kharip 2023 online mahadbt

नमस्कार मंडळी आणि शेतकरी बंधुनो राष्ट्रीय कृषी विकास या योजने मधून किंवा अंतर्गत
शेतकऱ्यांसाठी या योजनेमधून बियाणे अनुदान वितरण केले जात आहे या संदर्भात आपण या
लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. शेतकरी बंधुनो
, खरीप 2024 या वर्षी साठी महाराष्ट्र सरकार कडून
शेतकऱ्यां साठी अनुदानावर बियाणे वाटप केले जाणार आहे यामध्ये पीक प्रात्यक्षिकरता
100% अनुदान तसेच प्रमाणित बियानाकरिता 50% अनुदानावर बियाणे वाटप केले जाणार आहे अशी माहिती समोर आली
आहे. ज्या शेतकऱ्यांना यावर्षी म्हणजे खरीप
2024 साठी अनुदानावर ( 50% / 100% )  बियाणे पाहिजे असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मागणी
करावी त्यानंतर त्यांना लवकरच ते बियाणे मिळणार आहे असे सांगण्यात आले आहे. तर
ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा या संदर्भात पुढे माहिती पाहणार आहोत.

पीक प्रात्यक्षिकामध्ये ( 100% अनुदान ) यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे
सोबत खत किंवा जी पूर्ण प्रक्रिया आहे ते सर्व खर्च करून पेरणीचे अनुदान सोबत धरले
जाणार आहे पण या ठिकाणी पीक प्रात्यक्षिकरणं अनुदान हे
1-1  एकर मध्ये धरले जाणार आहे.

 

1. बियाणे अनुदान योजना 2024 पिकांचे नावे ? Biyane Anudan 2023 Crop Name ?

    राअसूअ अंतर्गत ( राज्य अन्न सुरक्षा
अभियांर्गत ) जिल्हानिहाय पिकाची वर्गवारी केली आहे. या ठिकाणी ज्या पिकाची
मान्यता आहे ती पाहू
, यामध्ये

 

1.तूर

2.कापूस

3. मूग

4.सोयाबीन

5.उडीद

6.वाटणे

7. मका

8.
बाजरी

9. इतर पिके सुद्धा आहेत.

 

 


2. बियाणे अनुदान योजना 2024
अंतर्गत किती अनुदान मिळणार

 

     केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा
अभियानातंर्गत खालील अनुदान दिले जाणार आहे

 

1. पीक प्रात्यक्षिकरीता – 100% अनुदान

2. प्रमाणित बियानाकरिता  50 % अनुदान

 

3. बियाणे अनुदान योजना 2024 ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? Biyane Anudan 2023 Online Application ? 

  शेतकरी  बंधुनो राष्ट्रीय अन्न
सुरक्षा अभियान अंतर्गत बियाणे अनुदान घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले
आहेत तुम्ही मूग
, बाजरी, तूर,उडिद, कापूस, मका,सोयाबीन, भात आणि इतर पिके यासाठी अर्ज करू
शकता. प्रथमत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या
Madbt
फार्मर
महाडीबी
टी
) या संकेतस्थळावर ( संकेतस्थळ लिंक ) यायचे आहे. या ठिकाणी आल्यावर
खालील स्टेप पूर्ण करा

 

Biyane Anudan 2023 online Application



 

1. महाडीबीटी पोर्टल ( farmer ) यावर आल्यानंतर तुमचे अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता , जर अकाउंट नसेल तर तुम्ही या संकेत स्थळावर आल्यानंतर उजव्या
बाजूला नवीन अर्जदार नोंदणी आहे त्यावर क्लीक करून नवीन नोंदणी करू शकता त्यानंतर
लॉग इन करा ( नवीन नोंदणी साठी आधार कार्ड आणि त्याला मोबाईल नंबर लिंक असेल तर
उत्तम लागेल अकाउंट तयार होईल.)

 

 

 

2. लॉग इन  केल्यानंतर इतर माहिती विचारेल ती व्यवस्थित
भरा ( नाव
, पत्ता, बँक माहिती आणि शेत जमिनीची माहिती ) 100% प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बियाणे साठी अर्ज करू शकता

 

Biyane Anudan 2023 mahadbt

 

3. बियाणे साठी अर्ज करताना तुम्हाला
बियाणे
, औषधे व खते हा पर्याय निवडावा लागेल.निवडल्यानंतर
यामध्ये तालुका
, गाव, सर्वेक्षण क्रमांक / गट क्रमांक, त्यानंतर पीक निवडा, अनुदान प्रकार (
प्रमाणित बियाणांचे वितरण
, पीक प्रात्यक्षिक, संकरित किंवा सुधारित ( बियाणांचा प्रकार ), वाण प्रकार ( नवीन किंवा जुने ), वाण आणि शेवटी क्षेत्र एक एकर च्या पुढे निवडायचे आहे.
त्यानंतर तुम्ही माहिती जतन करून यावर्षी माहिती जर पहिल्यांदा भरत असाल तर फी
भरून अर्ज सादर करू शकता.

 

Biyane Anudan 2023 payment mahadbt



 
4. बियाणे अनुदान 2024 साठी आवश्यक
कागदपत्रे कोणती लागणार आहे
? Biyane Anudan 2024 Important Document ?

1. 7/12 उतारा

2. 8- अ उतारा ( दाखला )

3. अनुसूचित जाती- जमातीचे असाल तर
वैध जात प्रमाण पत्र

4. त्यांनतर पूर्व संमती पत्र

5. हमी पत्र

 

5. बियाणे अनुदान योजना 2024 ( Biyane Anudan yojana 2023 )  जुना अर्ज असेल तर रद्द असा करा ?

 

शेतकरी बंधुनो नवीन अर्ज करतेवेळी जर तुमचा बियाणे संदर्भात जुना अर्ज असेल तर तो पहिल्यादा रद्द करा त्यानंतरच नवीन अर्ज करा. 

जर बियाणे संदर्भात जुना अर्ज रद्द करायचा असेल तर तुम्ही अर्ज केलेल्या बाबी हा पर्याय निवडा तेथे तुम्ही जेवढे अर्ज केलेले असतील ते सर्व त्या ठिकाणी दिसतील पण आपल्याला बियाणे संदर्भात जुना अर्ज रद्द करायचा आहे त्यामध्ये ( लिस्ट ) मध्ये दिसेल. त्याच्याच समोर तुम्हाला अर्ज रद्द करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लीक करून तुम्ही जुना अर्ज रद्द करू शकता.अर्ज रद्द करताना नोंदणी कृत मोबाईल वर एक टेक्स्ट मेसेज जाईल तो टाकल्यानंतर तो जुना अर्ज रद्द होईल. अश्या प्रकारे तुम्ही जुना अर्ज रद्द करू शकता

 

 

 

बियाणे अनुदान 2024 ऑनलाईन फी ?  Biyane  Anudan 2023 Online fees : 

बियाणे 2023 अनुदान साठी अर्ज करतेवेळी किंवा अर्ज सादर केल्यानंतर फी भरावी लागते ती 23.60 रुपये एवढी आहे पण फी मात्र यावर्षी जर नवीनच फॉर्म भरला असेल त्यांच्याकडूनच घेतली जाते. जर 2024 वर्षी जर इतर घटकासाठी अर्ज या आधी केलेला असेल तर बियाणे अनुदान 2023 साठी पुन्हा फी घेणार नाही डायरेक्ट अर्ज सादर होईल.

 

 

 

बियाणे अनुदान 2024 साठी यशस्वी अर्ज सादर केल्याची अश्या प्रकारे करा ?
( Biyane anudan 2024 ) 

 

बियाणे अनुदान 2024 फॉर्म भरल्यानंतर त्यानंतर 23.60 रुपये एवढी ऑनलाईन फी भरल्यानंतर आपला अर्ज यशस्वी झाला आहे की नाही किंवा यशस्वी अर्ज भरला आहे की नाही, हे पाहण्यासाठी तुम्ही mahadbt च्या सादर केलेले अर्ज या टॅब मध्ये पाहू शकता यावर क्लीक केल्यानंतर तुम्ही छाननी अंतर्गत अर्ज याठिकाणी अर्ज दिसत असेल तर तो अर्ज यशस्वी भरला आहे असे स्पष्ट होते त्याठिकाणी पावती प्रिंट हा ऑपशन दिसेल त्यावर क्लीक करून तुम्ही हा अर्ज प्रिंट काढून स्वतःकडे ठेवू शकता.

 

 

 

● Mahadbt biyane anudan online registration महाडीबीटी बियाणे अनुदान साठी नोंदणी कोठे करायची ?

 

खरीप 2024 बियाणे अनुदान साठी नाव नोंदणी साठी तुम्हाला mahadbt ( महाडीबीटी ) या शेतकरी पोर्टल वर जाऊन बियाणे आणि खते हा घटक
निवडून ऑनलाईन अर्ज करायचा आहे

 

 

बियाणे अनुदान 2024  किती टक्के आहे ?

बियाणे अनुदान 2024 हे दोन पद्धतीचे आहे पाहिले म्हणजे पीक प्रात्यक्षिकरण
यामध्ये
100 % अनुदान दिले
जाणार आहे. त्यांनतर दुसरे प्रमाणित बियाणाकरिता
50 % अनुदान दिले जाणार आहे.

 

 

बियाणे अनुदान 2024 हे कोणा मार्फत शेतकऱ्याना दिले जाते ?

बियाणे अनुदान 2024 हे केंद्र शासनाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंर्गत
दिले जात आहे.

 

 

बियाणे अनुदान 2024 कोणत्या पिकांसाठी आहे ?

बियाणे अनुदान 2024 यामध्ये कापूस  (
कॉटन )
, उडीद, तूर, सोयाबीन, नाचणी, बाजरी, भुईमुग, भात, मका, वरई/ भगर, सोयाबीन आदी सर्व ( जिल्हानिहाय वेगवेगळे पिके आहेत ) दिले
जाते

 

  •  Mahadbt biyane anudan last date महाडीबीडी बियाणे अनुदान शेवटची तारीख ?

Mahadbt biyane anudan shevatchi tarikh 2024 मध्ये 4 एप्रिल 2024 अशी आहे

 

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

2 thoughts on “बियाणे अनुदान योजना 2024, बियाणे अनुदान अर्ज सुरू | Mahadbt Biyane Anudan 2024”

Leave a Comment