कडबा कुट्टी 50 % अनुदानावर अर्ज सुरू, असा करा अर्ज Kadaba Kutti Machine yojana Application

 कडबा कुट्टी 50 % अनुदानावर अर्ज सुरू, असा करा अर्ज Kadaba Kutti Machine yojana Application

 
Kadaba Kutti Machine Application

 

 

           नमस्कार मंडळी आपला बळीराजा या ब्लॉग वेबसाईट मध्ये आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मंडळींनो महाराष्ट्र सरकार नेहमी शेतकरी यांच्या हिताचे योजना आणत असतात. याचा फायदा बरेच शेतकरी घेत असतात. तर काही शेतकऱ्यांना ह्या योजना कळण्याच्या आत बंद झालेली असते. त्यामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले असतात.

 

शेतकरी बंधुनो महाराष्ट्र सरकारने एक नवीन पोर्टल चालू केले आहे त्यामार्फत तुम्ही सर्व शेती अवजारे तसेच इतर सुविधांना सर्व शेतकरी बंधू फायदा घेऊ शकतात. यामध्ये भेदभाव केला जात नाही. आपण आज मनुष्य चलित कडबा कुट्टी मशीन जी सध्या 50% अनुदानावर शेतकरी बंधूना अर्ज केल्या नंतर मिळू शकते. या साठी सर्व शेतकरी बंधू अर्ज करू शकतात.

 

 

कडबा कुट्टी मनुष्य चलीत मशीन साठी  कोण अर्ज करू शकतात ?

– 10 एकर पेक्षा कमी जमीन क्षेत्र आहे ते सर्व शेतकरी या साठी अर्ज करू शकतात.

– अनुसूचित जाती जमाती मधील सर्व शेतकरी सुद्धा अर्ज करू शकतात.

 

 

अनुदान किती दिले जाते मनुष्य चलीत कडबा कुट्टी मशीन साठी ?

– महिला शेतकरी तसेच अल्पभूधारक शेतकरी याना 20 हजारा पर्यंत अनुदान दिले जाते.

– 20 हजार रु. म्हणजे जवजवळ 50% अनुदान दिले जाते. 

जे शेतकरी अल्प भूधारक नाही त्यांना 16 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते.

 

 

कडबा कुट्टी साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे ?

– आधार कार्ड

– बँक पासबुक ( सरकारी )

– सातबारा व 8 अ उतारा

 

अर्ज कसा करणार या कडबा कुट्टी मशीन साठी ?

अर्ज करण्यासाठी सुरुवातीला Mahadbt ( महा डीबीटी ) या वेबसाईट वर यायचे आहे. आल्यानंतर सुरुवातीला नवीन रेजिस्ट्रेशन करून घ्या यामध्ये नाव, लॉग इन आयडी, तसेच आधार व्हेरिफिकेशन ओटीपी, पत्ता, जमिनीचे क्षेत्र, बँक पासबुक आणि सिंचन सुविधा हे सर्व माहिती भरा यानंतर तुमची प्रोफाइल 100 % पूर्ण होईल .

 

– त्यानंतर तुमच्या समोर अर्ज करा असा ऑपशन येईल त्यावर क्लीक केल्यानंतर कृषी यंत्र औजाराच्या खरेदी साठी अर्थसाह्यय हा पर्याय निवडा यामध्ये ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलीत औजारे किंवा मनुष्य चलीत हे निवडा ( तपशील मध्ये )

 

– तपशील नंतर HP श्रेणी निवडायला सांगेल यामध्ये तुम्ही ( तुम्हाला जसे पाहिजे तसे उदा . 20 BHP पेक्षा असे निवडा किंवा जास्त निवडा )

 

– HP श्रेणी निवडल्या नंतर उपकरण यामध्ये फॉरेज/ ग्रास अँड स्ट्रॉ / रेसिड्यू mangement / कटर / श्रेडर हा पर्याय निवडा

 

– त्यानंतर मशीन प्रकार मध्ये कडबाकुट्टी ( मशीन चाफ कटर ) हे सर्व निवडून अर्ज करू शकता.

 

Tags : 

kadaba Kutti Machine Application Online Mahadbt

Mahadbt Kadaba Kutti Machine 

 

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment