june ferfar : नमस्कार मंडळी शेतकरी किंवा आपल्या बळीराजा च्या आयुष्यातील महत्वाचा भाग म्हणजे 7/12 , 8अ, तसेच फेरफार आणि इतर सर्व कागतपत्रे हे सर्व खूप महत्वाची आहेत. याशिवाय असे म्हणता येईल की आयुष्यच अपूर्ण आहे. त्यामुळे बळीराज्याच्या आयुष्यात या रेकॉर्डला खूप असाधारण महत्व आहे. बळीराजाला विविध टप्प्यावर या जुन्या कागतपत्रे यांची आवश्यकता भासते उदा. कुणबी दाखले, जुने रेकॉर्डस् पाहण्यासाठी ( उदा – विहीर कोणाच्या नावावर आहे , वारस कोण आहेत). तसेच शेतजमीनीचा कोणता व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचे पुरावे किंवा त्याचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे.
june ferfar : आता हे रेकॉर्ड साठी आपल्या बळीराजाला तहसील रेकॉर्ड्स विभागात तसेच सरकारी अधिकाऱ्यांनाकडे कायम हेलफाटे मारावे लागतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तर होतोच सोबत यामध्ये पैसा आणि वेळ खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. सरकारने यावर उपाय म्हणून आता ऑनलाईन सर्व digital स्वरूपात कागदपत्रे available केले आहेत.
आता हे ऑनलाईन स्वरूपात डिजिटल कागतपत्रे कसे काढायचे हे पाहणार आहोत. हे कागतपत्रे काढणे खूप सोप्पे झाले आहे.. तुम्ही सहज मोबाईल मध्ये सुद्धा हे कागतपत्रे काढून ते जपून ठेऊ शकता. सुरुवातीला 7 जिल्ह्यात ही सेवा सरकारने चालू केली त्यानंतर आता ही संख्या 19 जिल्ह्यावर गेली आहे
आता जुने शेत जमिनीचे अभिलेख ( रेकॉर्डस् ) कसे पहायचे ?
- सुरुवातीला तुम्हाला https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या पोर्टलवर यायचे आहे.
- त्यानंतर नवीन रेजिट्रेशन करून अकाउंट लॉग इन करा
- अकाउंट लॉग इन करून या ठिकाणी बेसिक किव्हा ऍडव्हान्स हा ऑपशन निवडून तुम्ही आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुम्हाला हवे असणारे कागदपत्रे pdf स्वरूपात काढू शकता हे सर्व सरकारी कागदपत्रे सरकारी वेबसाईट वरून काढल्यामुळे हे कोठेही वापरू शकता.