शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! यावर्षी इतर वर्षाच्या तुलनेत अधिक पाऊस ! सरासरीपेक्षा जास्तच पाऊस India Mansoon 2024 IMD update

India Mansoon 2024 IMD update : नमस्कार शेतकरी बंधूंनो मागील वर्षीपासून दुष्काळाचे सावट असताना याचा परिणाम शेतमालावर होत होता. नुकतेच आय एम डी ( IMD ) यांनी मान्सून संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे, यावर्षी मान्सून हा इतर वर्षाच्या तुलनेत अधिक जास्त असणार आहे.

ही परिस्थिती 5 ते 10 वर्षातून एकदा होत असते. कारणही तसेच आहे चला तर. काय कारणे आहेत की यावर्षी इतर वर्षाच्या तुलनेत जास्त प्रमाणात अधिक पाऊस असणार आहे आणि ही आपल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे.

India Mansoon 2024 IMD update : शेतकरी बंधूंनो मागच्या वर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडला होता. याचा परिणाम डायरेक्ट शेतमालावर झाला होता. काही ठिकाणी पिके जळून गेली तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकाची नुकसान झाले होते. सध्या जर पाहिलं तुम्ही मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट आहे. तेथे आजही बऱ्याच ठिकाणी टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मान्सून किंव्हा पाऊस आपल्या आयुष्याचा भाग च झालेला आहे. कोणीही असो किंवा आपला बळीराजा हा मान्सूनचा आतुरतेने वाट पाहत असतो.

India Mansoon 2024 IMD update : शेतकरी बंधूंनो, यावर्षी मानसून चक्र जास्तच प्रबळ झालेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका यादरम्यान महासागरात झालेल्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणावर ” ला लीना ” सक्रिय झाले आहे. ला लिना मुळे जे मान्सून वारे आहेत ते कितीतरी पटीने वाढतात. त्यामुळे हे जे वारे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पाऊस हा सरासरीपेक्षा 10 ते 15 पट जास्त सोबत नेतात. ज्यावेळी प्रशांत सागरात ला लिना प्रभाव जाणवतो त्यावेळी भारतामध्ये मान्सून हा सरासरीपेक्षा जास्त येत असतो.

हे कारण आहे की, यावर्षी मान्सून हा सरासरीपेक्षा खूपच जास्त असणार आहे. आणि तुम्ही पाहिले असेल की मोठ्या प्रमाणावर उष्णता सुद्धा जाणवते. हे कारण आहे की मान्सून मोठ्या प्रमाणावर भारताकडे आकर्षित झालेला आहे. येत्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये सोबत महाराष्ट्र मध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment