तुम्हालाही नुकसान भरपाई मिळाली नाही ना ? मग आत्ताच्या आत्ता हे काम करा लगेच मिळेल नुकसान भरपाई | Dushkali Anudan 2024 Maharashtra

Dushkali Anudan 2024 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासन नेहमी शेतकऱ्यांचे हिताच्या दृष्टीने अनेक पावले उचलत असते. यामध्ये विविध अनुदाने असतात. पण हे अनुदान मिळवताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा असे होते की शेजाऱ्याला हे दुष्काळ अनुदान मिळतं, पण आपल्यालाच मिळत नाही. तर हे अनुदान का मिळत नाही या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत.

दुष्काळ अनुदान Dushkali Anudan 2024 Maharashtra

तुम्हालाही माहित असेल की या वर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळ परिस्थिती झाली आहे यामुळे शेतमालाचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर दुष्काळ सुद्धा पडलेला आहे. त्याच्यामुळे शासनाने विविध जिल्ह्यांना या दुष्काळी अनुदानाचे पैसे पाठवले आहेत.

हे दुष्काळ अनुदान घेताना विविध टप्प्यातून जावं लागतं यामध्ये केवायसी असेल, किंवा तुमच्या आधार आणि बँक लिंकअडचणी असतील यामुळे सुद्धा हे दुष्काळी अनुदान आपल्या बँक खात्यावर येत नाही. बऱ्याचदा असे होते की गावांमध्ये दुष्काळ अनुदानाच्या याद्या आलेले असतात पण त्या याद्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यावेळेस न केल्यामुळे हे जे अनुदान आहे ते परत जाते किंवा शेतकऱ्याला ते मिळत नाही.

📝 हि बातमी पहा : शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर crop insurance list 2024 maharashtra 📝

Dushkali Anudan 2024 : नुकतेच महाराष्ट्र महसूल ग्रामविकास तसेच कृषी विभागाने यांनी दुष्काळाचे पंचनामे सुद्धा केले होते कदाचित तुम्हाला माहित असेल. ज्यांनी ज्यांनी हे पंचनामे केलेली आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचे पैसे आले आहेत मग ते दुष्काळ अनुदान असो या गारपीट असो, सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आलेत पण बरेच असे शेतकरी आहेत त्यांनी हे पंचनामे केली असून देखील त्यांना हे अनुदानाचे पैसे आलेले नाहीत, त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार खात्याशी संलग्न असावे तरच हे दुष्काळ अनुदानाचे पैसे तुमच्या बँक खात्यावर येणार आहेत.

Dushkali Anudan 2024 Maharashtra
Dushkali Anudan 2024 Maharashtra

दुष्काळ अनुदान कसे घ्यावे Dushkali Anudan 2024 Maharashtra

आता हे आधार कार्ड बँक खात्याचे संलग्न कसे करणार, यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन बँक आणि आधार लिंक फॉर्म भरून द्यायचा आहे किंवा आधार सीडिंग चा फॉर्म बँकेमध्ये जमा करायचा आहे. काही तासातच तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न होईल. ज्यावेळी हे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी संलग्न होईल त्याच्यानंतरच हे आधार मार्फत पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे.

📝 हि बातमी पहा : खरीप 2023 पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी Kharip Pika Vima 2023 news 📝

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment