विमा सखी योजनेच्या महिलांना मिळणारे लाभ

घटकमाहिती
योजनेचे नावविमा सखी योजना
उद्देशमहिलांचे आर्थिक सक्षमीकरण व रोजगार
अंमलबजावणी करणारी संस्थाभारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC)
शुभारंभ तारीख9 डिसेंबर, 2024
अधिकार क्षेत्रसंपूर्ण भारत
लाभार्थ्यांची संख्या2 लाख महिला (तीन वर्षांत)
अधिकारतेच्या अटीकिमान 10वी पास, वय 18 वर्षे पूर्ण
लाभ प्रकारतपशील
प्रशिक्षण कालावधी3 वर्षे
स्टायपेंड रक्कमपहिल्या वर्षी – ₹7,000दुसऱ्या वर्षी – ₹6,000तिसऱ्या वर्षी – ₹5,000
रोजगार संधीएलआयसी एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर
टार्गेट पूर्ण केल्यास लाभकमीशन, पदोन्नती आणि अन्य प्रोत्साहनपर लाभ

विमा सखी योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs )

प्रश्नउत्तर
1. विमा सखी योजना म्हणजे काय?विमा सखी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, जी महिलांना विमा क्षेत्रात रोजगार संधी देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
2. विमा सखी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
3. योजनेचा शुभारंभ कधी झाला?9 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
4. ही योजना कोण राबवते?ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे राबवली जाते.
5. योजनेसाठी पात्रता काय आहे?महिलांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे व शिक्षण किमान 10वी पास असणे आवश्यक आहे.
6. महिलांना किती स्टायपेंड मिळेल?पहिल्या वर्षी ₹7,000 प्रति महिना, दुसऱ्या वर्षी ₹6,000, तर तिसऱ्या वर्षी ₹5,000 स्टायपेंड दिले जाईल.
7. विमा सखी योजनेत नोकरीच्या कोणत्या संधी आहेत?महिलांना एलआयसी एजंट किंवा चांगली कामगिरी केल्यास डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नोकरी मिळू शकते.
8. महिलांना कमीशन कधी मिळते?जेव्हा विमा सख्या निर्धारित टार्गेट पूर्ण करतात, त्यांना कमीशन आणि प्रोत्साहन रक्कम मिळते.
9. पदवीधर महिलांना कोणता फायदा होतो?पदवीधर महिलांना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून उच्च पदावर काम करण्याची संधी मिळते.
10. एकूण किती महिलांना रोजगार मिळणार आहे?तीन वर्षांत एकूण 2 लाख महिलांना विमा सखी योजनेत रोजगार देण्याचे लक्ष्य आहे. सुरुवातीला 35,000 महिलांना नोकरी दिली जाईल.