आता 5 जी सुरुवात अहमदनगर मध्ये !

 

 

 

Ahmednagar 5G Service News Today : 

Ahmednagar : इंटरनेट वेगवान वापर आता सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर होत आहे. मोठ्या प्रमाणावर डेटा आणि इंटरनेट स्पीड ची मागणी वाढत असताना जिओ मार्फत अहमदनगर शहरात 10 जानेवारी 2023 पासून 5 जी सेवा ( सर्विस ) चालू झाली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात 5 जी प्रथमतः सेवा / ऑपेरेटर म्हणून रिलायन्स जिओ ठरला आहे.

 

 

10 तारखेपासून  आग्रा, कानपुर, मेरठ, प्रयाग राज, तिरुपती, नेल्लोर, कोझिकोड, त्रिसूर ( केरळ ), नागपूर, आणि अहमदनगर या शहरात सेवा सुरू झाली आहे. जिओ युजर्स ( वापरकर्ते ) याना कोणतेही अतिरिक्त शुल्काशिवाय 1gbps पर्यंत अमर्यादित 5 जी डेटाचा आनंद घेऊ शकणार आहे. 

 

 

रिलायन्स जिओने आज दहा शहरामध्ये ही सेवा सुरू केली आहे. यापैकी बहुतांश शहरामध्ये आता सेवा सुरू झाली आहे.

 

 

5 जी इंटरनेट स्पीड सेवांचा फायदा प्रामुख्याने ई गव्हर्नस, शिक्षण, ऑटोमेशन, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, गेमिंग, आरोग्यसेवा, कृषी, आयटी आणि एसएमईएस, तसेच इतर सर्वच उद्योग क्षेत्राला याचा फायदा होणार आहे.

 

 

 

ग्राहकांना कोणत्या पद्धतीने फायदा होणार ?

 

  • डेटा हाय स्पीड मध्ये मिळणार
  • ऑनलाईन कृषी , शिक्षण , ई गव्हर्नस तसेच आयटी क्षेत्राला याचा मोठा फायदा
  • सध्या welcome ऑफर मध्ये कोणतेच जास्त किंवा अतिरिक्त शुल्क नाही.
  • सिम बदलण्याची गरज सध्या नाही किंवा आवश्यकता नाही.
  • पण मात्र जो तुम्ही मोबाईल वापरणार आहात तो मात्र 5 जी सपोर्ट असणारा हवा, तरच ती सेवा चालणार आहे.

 

जिओ अधिकाऱ्यांची महाराष्ट्र बाबत ( डिजिटलायझेशन पूर्ण सपोर्ट / पाठींबा )

  जिओ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या चार र

राज्यातील या दहा शहरामध्ये ( वरील ) ‘जिओ टू 5 जी’ सेवा चालू करताना अभिमान वाटत आहे. देशांतर्गत इंटरनेट स्पीड वाढविला आहे. नवीन वर्षाला प्रत्येक जिओ युजर्सने ‘जीओ टू 5 जी फायदा घ्या. या मध्ये ( उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र या राज्य सरकारने डिजिटलायझेशनला पूर्ण सपोर्ट ( पाठिंबा ) दिला आहे.

 

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment